पाडलोस येथे पट्टी बांधून अपघात टळणार का…?

महेश कुबल : कायमस्वरूपी ठोस उपाययोजण्याकडे दुर्लक्ष..

बांदा : प्रतिनिधी
पाडलोस मडुरा मार्गावरील केणीवाडा येथे आठ दिवसांपूर्वी मालवाहू टेम्पोचा मोठा अपघात सुदैवाने टळला. दोन गाड्यांना बाजू देताना रस्ता सुमारे तीन ते चार फूट खोल खचला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ लाकडाच्या साहाय्याने पट्टी बांधण्याचे काम केले. तत्काळ स्वरूपात या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता होती मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पाडलोस तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी केला आहे.


न्हावेली-मडुऱ्याच्या दिशेने जाताना प
पाडलोस केणीवाडा डोंगराचीकोंड येथे रस्ता उजव्या बाजूने खचत चालला आहे. ग्रामस्थांनी बांधकाम विभागाचे लक्ष वेधल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने केवळ लाकडी काठीच्या साहाय्याने पट्टी बांधण्यात आली आहे. यामुळे अपघात टळणार नसून यासाठी ठोस उपाययोजनाची आवश्यकता आहे.
नैसर्गिक आपत्ती मधून अशावेळी तत्काळ निधी खर्च करून हानी टाळण्यासाठी संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे. मुळात अशी कामे एप्रिल मे महिन्यात होणे गरजेचे असते. मात्र अभ्यास नसलेले अधिकारी व नियोजनाचा अभाव असल्यामुळे अशी धोकादायक परिस्थिती पाडलोस केणीवाडा येथे निर्माण झाली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तत्काळ ठोस उपाययोजना करावी अशी मागणी महेश कुबल यांनी केली आहे.

You cannot copy content of this page