⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला वेळागर ताज प्रकल्पाचा प्रश्न संदर्भात पुढाकार घेऊन मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी माजी आमदार राजन तेली यांची भेट घेत आभार मानत सत्कार केला.
याबाबत श्री तेली यांनी १५ ऑगस्ट रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनद्वारे या प्रश्न संदर्भात लक्ष वेधले होते.अखेर त्यांनी आपण सविस्तर याबाबत बैठक घेऊन मार्गी लावू असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी ते उपोषण मागे घेतले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी श्री.तेली यांचा पुढाकाराबद्दल सत्कार केला.
