सावत्र भावांचे सरकार आल्यास लाडकी बहिण योजना बंद होणार…

सुलोचना सावंत:तिन्ही विधानसभेत भाजपचा विजय करून परतफेड करा..

ओरोस ता.१८-:

आज आपण लाडक्या देवाभाऊ यांचे आभार मानण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित आहोत. महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणले त्यावेळी आमचे सावत्र भाऊ योजनेचा अपप्रचार करीत होते. परंतु अवघ्या ४५ दिवसांत आपल्याला लाभ मिळाला. तरीही सावत्र भावांना ही योजना नको आहे. त्यामुळे त्यांचे सरकार आल्यास ही योजना बंद होणार आहेत. त्यामुळे आपल्याला या सावत्र भावांचा पराभव करण्यासाठी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत भाजपला भरघोस मतदान करून याची परतफेड करायची आहे, असे आवाहन भाजप महिला मोर्चा महाराष्ट्राच्या सहप्रभारी सुलोचना सावंत यांनी आज केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत लाभार्थी ठरलेल्या महिलांचा भव्य मेळावा आज सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ सावंत बोलत होत्या. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे वरिष्ठ नेते अतुल काळसेकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजना सावंत, दीपलक्ष्मी पडते, प्रांतिक सदस्य संध्या तेरसे, सुप्रिया वालावलकर, पूजा करलकर, राजन तेली, कोकण विभाग संघटक शैलेंद्र दळवी, प्रज्ञा ढवण, मेघा गांगण, अशोक सावंत, बाबा मोंडकर, तन्वी चांदोस्कर आदींसह भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा, तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ सावंत यांनी, गोवा राज्यात ही योजना बारा वर्षे सुरू आहे. महिलांनी आता पैसे साठवून ठेवले पाहिजेत. सावत्र भावांना ही योजना नको आहे. म्हणजे ते निवडून आल्यावर ही योजना सुरू ठेवणार नाहीत. २०१९ ते २२ या काळात युतीच्या सरकारने सुरू केलेल्या योजना बंद केल्या. मतदानाचे माध्यम हे योग्य माध्यम आहे. यासाठी पूर्ण बहुमताचे सरकार यायला पाहिजे. तिन्ही आमदार निवडून आणू त्यावेळी समाधान वाटेल, असे सांगितले.

You cannot copy content of this page