⚡सावंतवाडी ता.१८-: कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेची ३० सावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार १८ ऑगस्ट २०२४ रोजी नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे संस्थेच्या अध्यक्षा श्रीम आनमारी जॉन डिसोजा यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीचे पॅरिश पिस्ट फा. मिलेट डिसोजा उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच प्रार्थना व दिपप्रज्वलन करून संस्थेचे संस्थापक सहकाररत्न ख्रि. पि.एफ डॉन्टस तसेच पंचतत्वात विलीन झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे सभासदांच्या पाल्यांचा शैक्षणिक तसेच क्रिडा क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादान केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर सावंतवाडी निरवडे येथील लिटिल सिस्टरर्स ऑफ पुअर करीत असलेली समाजसेवेची दखल घेऊन संस्थेच्यावतिने सुपिरियर सि.अनिता रोज यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व रोख रक्कम देऊन संस्थेच्या अध्यक्षा आनमारी डिसोजा, फा. मिलेट डिसोजा व संचालकांच्या हस्ते यथोचित्त सत्कार करण्यात आला. लिटिल सिस्टर्स ऑफ पुअर कोणत्याही पैशांची अपेक्षा न करता कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता अनाथ गोर गरीब ६० वर्षावरील वृध्द माणसांची आपुलकिने व प्रेमाने सेवा करतात त्यांची काळजी घेतात व यासाठी त्या स्वतः गावोगावी घरो घरी किंवा आठवडा बाजारात जाऊन लोकांकडे मदत मागतात व त्यातून आपला तसेच या वृध्द माणसांचा उदारनिर्वाह करतात अशी माहीती संस्थेचे सरव्यवस्थापक यांनी सभासदांना दिली. तसेच त्यांना त्यांच्या ह्या कार्यास पैशाचारूपाने किंवा वस्तूरूपाने मदत करून हया ईश्वररूपी सेवेस हातभार लावण्यासाठी विनंती केली. त्यानंतर सि. अनिता रोज यांनी आपल्या कार्याची दखल घेऊन आपला सत्कार केल्याबद्दल सर्व संचालक व सभासदांचे आभार मानले. वृध्दांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा असून यातूनच आपण येशू ख्रिस्ताला पाहतो असे उदगार काढले. त्यानंतर इतिवृत्त वाचन असिस्टंट जनरल मॅनेजर एवरिस्ट मेंडीस यांनी केले तर अहवाल वाचन सरव्यवस्थापक जेम्स बॉर्जीस यांनी केले. ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेच्या ठेवी २२२ कोटी तर कर्ज १६४ कोटी असून संस्थेची गुंतवणूक ७२ कोटी झाली आहे. संस्थेला २ कोटी ५० लाख निव्वळ नफा झाला असून संस्थेच्या सुरवातीपासूनचा ऑडीट वर्ग “अ” कायम राखला आहे. सभासदांना १४% लाभांश मंजुर करण्यात आला व सभा सुरू असतानाच सभासदांच्या सेव्हिंग खात्यावर जमा करण्यात आला त्यामुळे सभासदांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. संस्थेने पुढील पाच वर्षात ५०० कोटी ठेविचे उद्दिष्ट ठेवले असून त्याप्रमाणे कामकाज सुरू आहे. तसेच संस्थेचे कार्यक्षेत्रात वाढ किंवा शाखा वाढ करण्याच्या दृष्टीने अभ्यास चालू असल्याचे अध्यक्षा श्रीम आनमारी जॉन डिसोजा यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. तसेच संस्थेला सभासद ग्राहकांकडून मिळत असलेल्या सहकार्यावद्दल सर्वांचे
आभार मानले. त्यानंतर फा मिलेट डिसोजा यांनी आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या पुढील वाटचालीस सुभेच्छा
दिल्या. आभार प्रदर्शन संस्थेचे व्हा. चेअरमन पिटर दिया यांनी केले. सभेचे सुत्रसंचालन फॅन्की डॉन्टस यांनी केले.
