संजू परब यांच्या वाढदिवसाचे निमित्त: उद्या होणार बक्षीस वितरण..
⚡सावंतवाडी ता.१८-: सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव आयोजित व संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्ताने सावंतवाडी विठ्ठल मंदिर येथे घेण्यात आलेल्या भक्ती गीत गायन स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ नाटक कर्मी भाऊ साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त भक्ती गीत गायन स्पर्धा भरून निश्चितपणे एक वेगळेपण दाखवून दिले आहे आजच्या काळात अशा स्पर्धा घेणे फार गरजेचे आहे आणि हे उत्तम काम संजू परब यांनी केले आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केले यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर. निलेश मिस्त्री चेअरमन बाबुराव कविटकर प्रताप परब प्रल्हाद तावडे राजेश पास्ते सुहास सावंत गजानन बांदेकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण 19 ऑगस्टला सकाळी 11 वाजता होणार आहे यावेळी 25 स्पर्धकांनी सहभाग घेतला
