राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेसाठी मालवणच्या सिंधुदुर्ग कॉलेज ची विद्यार्थिनी हर्षदा पवार हिची निवड…
⚡मालवण ता.१४-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनसीसी विभागाअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेली तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थीनी एनसीसी अंडर ऑफिसर हर्षदा दीपक पवार हिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आज पर्यंतच्या इतिहासात एनसीसी विभागातून राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झालेली हर्षदा पवार ही पहिली खेळाडू ठरली…
