⚡बांदा ता.१४-: जागतिक प्रेम दिनाचे औचित्य साधून तरुणीला हटके स्टाईल मध्ये प्रेमाची मागणी घालणाऱ्या परप्रांतीय तरुणाला तरुणीने ‘प्रेमाचा प्रसाद’ देत श्रीमुखात भडकवली. आज भल्या पहाटे बांद्यात महामार्गावर ही घटना घडली.
याबाबत अधीक माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गवरून सदर तरुणी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या परप्रांतीय तरुणाने तिला ‘प्रपोज’ करत प्रेमाची मागणी घातली. तरुणाने अचानक मागणी घातल्याने तरुणी भेदरली. तिने तात्काळ प्रसंगवधान दाखवत त्या तरुणाच्या श्रीमुखात भडकवली. त्यानंतर तो तरुण खजिल झाल्याने त्याने तेथून पोबारा केला. याची चर्चा मात्र सुरु होती.
बांद्यात परप्रांतीय तरुणाला तरुणीने ‘प्रेमाचा प्रसाद’ देत श्रीमुखात भडकवली…
