वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर अध्यासी अधिकारी प्रशांत साळगांवकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली. यात अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल तर उपाध्यक्षपदी तृप्ती साळगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी वेंगुर्ला तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेचे सदस्य विलास दळवी, सुमन कामत, वंदना कांबळी, मोहन नंदगडकर, सायली पोखरणकर, नाना कोळेकर, प्रसाद पेडणेकर, विष्णू दाभोलकर, सचिव दिव्या पार्सेकर आदी उपस्थित होते. अध्यासी अधिकारी प्रशांत साळगावकर व सर्व सदस्य यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
