वेंगुर्ला प्रतिनिधी – वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग-तुळस यांच्यावतीने कै.गुरुदास रविद्र तिरोडकर स्मृतीप्रित्यर्थ १५ व १६ फेब्रुवारी या कालावधीत ‘अश्वमेध २०२५‘ महोत्सवाचे आयोजन केले आहे.
दि.१५ रोजी उत्सव मंगल कार्यालय, तुळस येथे सकाळी महारक्तदान शिबिर, दु.२.३० वा. रामेश्वर मंदिर, तुळस येथे बालवाडी, पहिली व दुसरीसाठी रंगभरण स्पर्धा, तर याच वेळेत तिसरी ते चौथी (जोकर), पाचवी ते सातवी (वासुदेव), आठवी ते दहावी (सार्वजनिक विहिर) साठी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा, दि.१६ रोजी सकाळी ९ वा. शिवाजी हायस्कूल, तुळस येथे स्तोत्र पाठांतर स्पर्धा, दुसरीपर्यंत गणपती स्तोत्र, तिसरी ते चौथीसाठी मारूती स्तोत्र पाठांतर, याचदिवशी सकाळी ९ वा. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा - सातवीपर्यंत ‘महाराष्ट्राची संत परंपरा‘, आठवी ते दहावी मराठी माध्यमासाठी ‘मराठी भाषा अभिजात-पुढे काय?‘, पहिली ते दहावीच्या इंग्रजी माध्यमासाठी ‘दी ग्रेट लिडर छत्रपती संभाजी महाराज‘, रात्रौ ७ वा. वेताळ मंदिर तुळस येथे वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‘पंचमुखी हनुमान‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
