डॉ. उत्तम फोंडेकर यांनी निर्मिती केलेल्या नवीन संकरीत शेवग्याला दिल्ली केंद्राची मान्यता…

⚡मालवण ता.१३-:
मालवण कुंभारमाठ मधील कृषी पुरस्कारप्राप्त आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांनी शेवग्याच्या दोन जातीचे परागीकरण आणि संकरण करून निर्मिती केलेल्या फिकट लाल रंगाच्या नवीन शेवग्याला अखेर दिल्ली केंद्राकडून मान्यता देण्यात आली आहे. या शेवग्याचे यशस्वी परीक्षणही करण्यात आले.

या शेवग्याच्या परीक्षणासाठी आलेल्या संशोधन पथकात केंद्रातील डॉ. सतीश डी., डॉ. रेवती, डॉ. एम. एस. शेडगे, डॉ. एच. पी. नाईक यांचा समावेश होता. त्यांनी जनुकीय गुणधर्म, त्यांची मोजमाप, बदललेला लाल रंग, बीटा कॅरोटीन यांची चाचपणी करून उत्तम फोंडेकर यांच्या संशोधनाला हिरवा झेंडा दाखवण्यात आली. तसेच त्यांच्या अधिकाराबाबत सविस्तर चर्चा झाली.

विद्यापीठ स्तरावरचे संशोधन वैयक्तिक डॉ. फोंडेकर यांनी केल्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक लक्ष्मण खुरकुटे, मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, डी. डी. गावडे आणि सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी फोंडेकर यांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page