कुडाळात जल्लोषात धुळवड साजरी…
कुडाळ : कुडाळ शहरात आज शहरवासियांनी मोठ्या जल्लोषात रंग आणि पाण्याची उधळण करत धुळवड आणि रंगपंचमी साजरी केली.नाक्यानाक्यावर आणि सोसायट्यामध्ये युवक, लहान मुले रंग खेळताना पाहायला मिळाले. यावेळी कुडाळ शहरातील दिड दिवसाच्या शिमगोत्सवाची धूलिवंदनाने सांगता झाली.शहरातील जिजामाता चौक येथे सालाबादप्रमाणे सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येत रंगांची उधळण करीत धुळवड साजरी केली. वेगवेगळी सोंगे…
