हायवे प्राधिकरणची कारवाई:ओरोस जिजामाता येथे सकाळीच कारवाई..
ओरोस ता १३
मुंबई-गोवा महामार्गालगत ओरोस जिजामाता चौक नजिक असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले असून नॅशनल हायवे ऑथॉरिटी यांनी अब्दुल हमीद सबुराती यांच्या मालकीच्या गादी कारखान्यावर कारवाई केली आहे. हायवे लगत अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासाठी नोटीस देवूनही ते न हटवल्यामुळे अखेर कारवाई केली आहे. पोकलेन व जेसीबीने अनधिकृत बांधकाम पाडून इमारत जमिनदोस्त केली आहे. कोकण गादी कारखाना व स्टील फर्निचर दुकानावर पोलीस बंदोबस्त व महसूल खात्याच्या मदतीने नॅशनल हायवे ऑथॉरिटी कडून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे कारवाई नंतर समाजातील काही घटकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
