बांदा पानवळ येथे महावितरणचा विद्युत खांब हा धोकादायक…
बाळा आकेरकर: त्वरित बदलण्याची केली महावितरण कडे मागणी.. ⚡बांदा ता.२८-: बांदा पानवळ येथे महावितरणचा विद्युत खांब हा धोकादायक स्थितीत कलंडला असून तो केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. याबाबत माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी लक्ष वेधले असून अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर हा खांब बदलावा अशी मागणी केली आहे.
