१४ महाविद्यलयातील ४३ विद्यार्थी आणि २४ प्राध्यापक सहभागी..
कुडाळ : बदलत्या काळानुसार संशोधनाची गरज लक्ष्यात घेऊन विध्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते असे प्रतिपादन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डाँ स्मिता सुरवसे यांनी केले . मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग व संत राऊळ महाराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २० वी जिल्हास्तरीय आविष्कार कार्यशाळा रविवारी, २७ एप्रिल २०२५ रोजी महाविद्यालयात पार पडली, त्या वेळी डाँ स्मिता सुरवसे ह्या बोलत होत्या.
या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सुनील पाटील उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्या डाँ स्मिता सुरवसे यांनी भूषविले.
आपल्या मनोगतात डॉ. सुनील पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय निवासी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक डॉ. डी एम सिरसट यांनी केले. या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठ विकास विभागाच्या ओ एस डी डॉ. मिनाक्षी गुरव, डॉ. सुनीता शैलजा, डॉ. रूपा राव या उपस्थित होत्या. प्रकल्प सादरीकरण, पीपीटी तयार करणे, गटचर्चा , संशोधन प्रकल्प तयार करून सादरीकरण करणे अशा विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व शिक्षकाना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध १४ महाविद्यालयाचे ४३ विद्यार्थी प्रतिनिधी व २४ प्राध्यापकानी सहभाग घेतला.
कार्यशाळेच्या उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन डाँ कमलाकर चव्हाण यांनी केले तर डॉ. कॅप्टन एस टी आवटे यांनी आभार मानले . ही २० वी आविष्कार कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. प्रमोद जमदाडे, तसेच प्रा भावेश चव्हाण, डॉ. कमलाकर चव्हाण, डॉ. नागेश काळे, डॉ. रविंद्र ठाकूर, प्रा राहुल देशमुख, प्रा प्रणव तेंडोलकर प्रा संतोष चौगुले, प्रा खेमराज कुबल, प्रथमेश दळवी, मंदार कोरगावकर , श्याम दाभोलकर, अक्षय परब यांचे सहकार्य लाभले.
