बांदा शहराला अवकाळी पावसाने झोडपले…
⚡बांदा ,ता.२०-: बांदा शहर व परिसराला आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दुपारी सुरु झालेली पावसाची झोड सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती. पावसाच्या कहराने बांदा शहरात पाणीच पाणी झाले. बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे पुलावर पावसाचे पाणी साठल्याने वाहतूक खोळंबली होती.आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी शहरात जोरदार पावसास सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्याने…
