वेंगुर्ला शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी…

वेंगुर्ला प्रतिनिधी- सोमवारपासून हुलकावणी देणा-या पावसाने वेंगुर्ला शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी दुपारनंतर जोरदार हजेरी लावली.

  एप्रिल - मे महिन्यामध्ये कडक उन्हाळ्याने नागरिकांसह प्राणी सुद्धा हैराण झाले होते. दरम्यान, जिल्ह्यात ब-याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. सोमवारपासून वेंगुर्ला शहरात पावसाळी वातावरण निर्माण होत होते. परंतु, पाऊस पडत नव्हता. थंडगार पावसाच्या प्रतिक्षेत नागरिकांसह प्राणी असताना आज मंगळवारी दुपारनंतर वेंगुर्ला शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी काहीकाळ ढगांचा गडगडाट आणि वीजांचा लखलखाट सुरू होता. तर विद्युत पुरवठाही खंडीत झाला. सध्या ब-याच ठिकाणी विविध देवदेवतांचे वर्धापनदिन सुरू आहेत. यानिमित्त दशावतारी नाटकांसह अन्य कार्यक्रमही आयोजित केले आहेत. रात्रौपर्यंत पाऊस सुरू राहिल्यास असे कार्यक्रम रद्द होण्याचीही शक्यता आहे.
You cannot copy content of this page