Headlines

वेंगुर्ला कृषी कार्यालय जिल्ह्यात प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.२८-: मुख्यमंत्री महोदयांच्या महत्त्वाकांशी १०० दिवशीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत सुक जीवनमान, सुशोभिकरण, स्वच्छता, कार्यालयीन सोईसुविधा, तक्रार निवारण अशा एकूण दहा मानंकानुसार सर्वोत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्यात प्रथम तसेच कोकण विभागीयस्तरावर तृतीय क्रमांक पटकाविला.यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी, अधिकारी सिधुदुर्ग तसेच उपविभागीय कृषी अधिकारी, सावंतवाडी यांनी तालुका कृषी…

Read More

नमसवाडी ब्राह्मण वर्धापनदिन ३१ रोजी…

वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा-नमसवाडी येथील श्री देव ब्राह्मण मंदिराचा ५४वा वर्धापनदिन ३१ मे रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. यानिमित्त सकाळी लघुरुद्र, अभिषेक, श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा.महाप्रसाद, सायंकाळी भजन व रात्रौ ७.३० वा. पार्सेकर दशावतार मंडळाचा दणकेबाज नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्राह्मण प्रासादिक सेवा मंडळातर्फे केले आहे.

Read More

पूर्वस देवस्थानचा वर्धापनदिन ३० मे रोजी…

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील श्री देव पूर्वस देवस्थानचा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार दि. ३० मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी लघुरूद्र, अभिषेक, श्रीसत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, रात्रौ ९ वा. वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‘मच्छिद्रनाथ कपाली युद्ध‘ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

Read More

बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील पडवळ यांचे निधन…

⚡बांदा ता.२८-: बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील पडवळ यांचे आज सकाळी बांबोळी येथे उपचार सुरु असताना निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने गेले काही दिवस त्यांच्यावर गोवा बांबोळी येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली.

Read More

भरपावसात कंटेनर पेटला ; डोझर मशीन ही जळून खाक…

कणकवली : करूळ घाटात कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनरसह कंटेनर मध्ये असलेले डोझर मशीन ही जळून खाक झाले आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. कंटेनर करूळघाट मार्गे कोल्हापूरच्या दिशेने जात होता. करूळ घाटात गगनबावडा पासून ४ कि. मी. अंतरावर कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनर पूर्ण जळून खाक झाला आहे. तर कंटेनरमध्ये असलेले…

Read More

सिध्देश शिरसाट दोन वर्षाकरीता हद्दपार…

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर प्रवेश बंदी:कुडाळ पोलिसांची माहिती.. कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीतील सिध्देश अशोक शिरसाट वय ४३ वर्षे, रा. कुडाळ बाजारपेठ ता. कुडाळ याचेविरुध्द खून, सरकारी नोकरास मारहाण, मालमत्तेचे नुकसान करणे, दारु वाहतूक करणे, जुगार चालवणे, लोकांना धमकावणे यासारखे गंभीर गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याची माहीती उपलब्ध झाल्याने त्याचेविरुध्द हद्दपारीची कारवाई प्रस्तावित होती. त्यानुसार…

Read More

कणकवली तालुक्यात २४९८०० रुपयांचे नुकसान…

जाणवलीत घरावर फणसाची फांदी कोसळून मोठे नुकसान.. कणकवली : तालुक्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. मंगळवारी पहाटेपासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. नदी – नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कणकवली तालुक्यात साधारणपणे २४९८०० रुपयांचे नुकसान झाले होते. कणकवली तालुक्यातील जाणवली येथील रहिवासी अश्विनी अनिल कदम ( रा. जाणवली )…

Read More

वानहुआ इंटरनॅशनल ने दिलेली रुग्णवाहिका गरजूंसाठी खरोखर उपयुक्त ठरेल – फ्रेड व्हियु…

वानहुआ विकास सुरु ठेवेल आणि सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमांद्वारे आम्ही एकत्रितपणे देशालाही पाठिंबा देऊ.. कणकवली : वानहुआ इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड सर्वसामान्यांच्यासुदृढ आरोग्यासाठी ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आणि जनसामान्यांची सेवा हाच धर्म’ या तत्वांवर चालणारे असून नेहमीच सर्वसामान्यांसाठी काम करीत राहील, वानहुआ इंटरनॅशनल ने दिलेली रुग्णवाहिका गरजूंसाठी खरोखर उपयुक्त ठरेल.असे प्रतिपादन वानहुआ इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड चे…

Read More

देवबाग येथील शेखर मांजरेकर यांचे निधन…

⚡मालवण ता.२७-:मालवण तालुक्यातील देवबाग भांजीवाडा येथील हॉटेल व्यावसायिक आणि शशिकला हॉटेलचे मालक श्री शेखर धोंडी मांजरेकर (वय ५५ )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले शेखर मांजरेकर यांचा स्वभाव परोपकारी असल्याने त्यांचा मित्र परिवार दांडगा होता त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे देवबाग हायस्कुल चे शिक्षकेतर कर्मचारी गजानन मांजरेकर यांचे ते…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक संघाच्या अध्यक्षपदी संजय नरे…

⚡मालवण ता.२७-:सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक संघाच्या अध्यक्षपदी संजय गंगाधर नरे तर उपाध्यक्ष पदी संदेश रामचंद्र मालवणकर यांची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघाच्या नवनिर्वाचित सदस्यांची सभा अध्यासी अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संजय नरे यांची अध्यक्षपदी, तर संदेश मालवणकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गोविंद रामचंद्र चव्हाण, दाजी बापू हडकर,…

Read More
You cannot copy content of this page