भरपावसात कंटेनर पेटला ; डोझर मशीन ही जळून खाक…

कणकवली : करूळ घाटात कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनरसह कंटेनर मध्ये असलेले डोझर मशीन ही जळून खाक झाले आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे.

कंटेनर करूळघाट मार्गे कोल्हापूरच्या दिशेने जात होता. करूळ घाटात गगनबावडा पासून ४ कि. मी. अंतरावर कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनर पूर्ण जळून खाक झाला आहे. तर कंटेनरमध्ये असलेले मशीन ही जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच ठेकेदार श्री. वेल्हाळ यांनी तात्काळ पाण्याचे टँकर पाठवले आहेत. आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत कंटेनर चालक बालबाल बचावला आहे.

You cannot copy content of this page