पाडलोसमध्ये कालव्याचा भाग खचतोय…
शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता : संरक्षक भिंत बांधण्याची मागणी.. बांदा : प्रतिनिधीमडुरा पाडलोस हद्दीवरील पाडलोस भागात असलेल्या तिलारी पाटबंधारे विभागाच्या कालव्याचा भाग खचू लागला आहे. कालव्यापासून शेतकऱ्यांची जमीन केवळ दोन ते तीन मीटर अंतरावर असल्याने शेतकऱ्यांची जमीन कालव्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकसान होण्यापूर्वीच पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधण्याची मागणी, पाडलोस…
