मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या आवारात वृक्षारोपण…

मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम:शिवराजाभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी महाराज जयंती व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य*

सावंतवाडी : मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने काल सोमवारी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य व शिवराजाभिषेक सोहळा दिनांकनुसार, छत्रपती संभाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे व शिवराजाभिषेक सोहळा तिथीनुसार या सर्वांचे निमित्त साधून मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
सध्या पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध माध्यमातून वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत आणि सध्याच्या बेसुमार वृक्षतोडीची गंभीरता लक्षात घेता वृक्ष लावा, वृक्ष जगवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेंतर्गत मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम मळगाव येथे राबविण्यात आला. या निमित्ताने वृक्षारोपण करून वृक्षारोपणाचा व वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यात शाळेच्या आवारात चिकू, पेरू, पिवळा चाफा, माड, रामफळ आदी वृक्षांची रोपे लावण्यात आली. या उपक्रमावेळी समीर परब, मळगाव तंटामुक्ती अध्यक्ष संजय धुरी, शिवशंभू ग्रुपचे सुनील राऊळ, ज्ञानेश्वर राणे, रितेश राऊळ, सहदेव राऊळ आदी उपस्थित होते. या वृक्षारोपणाने शिवशंभू ग्रुपच्यावतीने सामाजिक दायित्वाचे एक आदर्श उदाहरण घालून देण्यात आले आहे.

You cannot copy content of this page