⚡कणकवली ता.०३-: शिवजयंती उत्सव २०२६ निमित्त शिवजयंती उत्सव मंडळ, हळवल यांच्या वतीने (तिथीनुसार) शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढीलप्रमाणे असणार कार्यक्रम – सकाळी ९.०० वा. – शिवछत्रपतींचे महापूजन
सकाळी १०.०० वा. – सत्यनारायणाची महापूजा
दुपारी १२.०० नंतर – आरती व तीर्थप्रसाद
सायंकाळी ७.०० वा. – सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ
रात्री ८.०० वा. – आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार प्रदान सोहळा
रात्री ८.३० वा. – वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचे दशावतारी नाटक सुरत चंद्रिका
तरी सर्व शिवभक्त व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन राजू राणे ( शिवजयंती उत्सव मंडळ, हळवल) यांनी केले आहे.
