आजारपणाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…

⚡देवगड ता.०३-:
कुणकेश्वर वरचीवाडी येथील गणेश भालचंद्र घाडी (३८) याने आपल्या राहत्या घरात किचन रुममधील लोखंडी हुकाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ६ वा. च्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश घाडी याने आजारपणाला कंटाळून दारुच्या नशेत आपल्या राहत्या घरात किचन रुममधील लोखंडी हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची खबर सत्यवान पांडुरंग घाडी (६४, रा. कुणकेश्वर वरचीवाडी) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. शवविच्छेदन देवगड ग्रामण रुग्णालयात करण्यात आले. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत. गणेश हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

You cannot copy content of this page