केंद्रशाळा दोडामार्ग नं. १ चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात…

⚡दोडामार्ग ता.०३-: केंद्रशाळा दोडामार्ग नं १ येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य दिपकजी गवस, ॲड. सोनू गवस, उपअभियंता सीमा गोवेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस, विस्तार अधिकारी सूर्यकांत नाईक, शिक्षण व आरोग्य सभापती संजना म्हावलकर, नगरसेविका संध्या प्रसादी, नगरसेवक नितीन मणेरीकर, केंद्रप्रमुख अंजली जोशी, उद्योजक उदय मयेकर, उद्योजिका नीलम गवस, मिनार मणेरीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते नव्याने उभारलेल्या गुरुसेवा रंगमंचाचे उद्घाटन व विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक जयसिंग गावित व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमित दळवी यांनी शैक्षणिक व भौतिक प्रगतीची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन एकता नाईक व दिंगबर काळे यांनी केले.

You cannot copy content of this page