कणकवली डीपी रोड नजीकच्या गटाराच्या चेंबरमध्ये पडलेल्या बैलाला जीवदान…

माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नागरिकांनी घेतली धाव..

कणकवली : शहरात डीपी रोड नजीक असलेल्या गटाराच्या चेंबरमध्ये आज सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास बैल पडल्याची घटना घडली. ही घटना समजतात माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या ही बाब तेथील काहींनी निदर्शनास आणली. त्यानंतर माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करत ठेकेदार अनिल पवार यांच्या कर्मचाऱ्यांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या बैलाला जीवदान दिले. डीपी रोड जवळील एका गटाराच्या चेंबरमध्ये सकाळच्या सुमारास हा बैल पडल्यानंतर येथील काही स्थानिकानी ही घटना पाहिली. त्यानंतर माजी उपनगराध्यक्ष श्री हर्णे यांच्यासहित स्थानिक लोकही या ठिकाणी जमा झाले. मात्र बैल ज्या चेंबर मध्ये पडला होता तिथून तो गटारातून त्या पुढील चेंबर मध्ये जाऊन थांबला. सुदैवाने बैलाला मोठी दुखापत झाली नाही. दरम्यान बैलाला बाहेर काढण्यासाठी जेसीबी द्वारे बेल्ट लावून चेंबरमध्ये कर्मचारी उतरून त्या बैलाला सुखरूप बाहेर काढले. यावेळी अनिल पवार, मिथुन ठाणेकर नागवे ग्रामपंचायत सदस्य संदेश उर्फ मन्या सावंत यांच्यासह अन्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page