बांदा केंद्र शाळेच्या चिमुकल्यांची वारकरी दिंडी ठरली लक्षवेधी…
⚡बांदा ता.०५-: बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्र शाळेच्यावतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत बांदा केंद्रशाळा ते विठ्ठल मंदिरापर्यंत आयोजित केलेली वारकरी दिंडी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध वेशभूषेमुळे लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांच्या या वारकरी दिंडी मुळे बांदा शहरात विठ्ठलमय वातावरण निर्माण झाले.
