‘शाळा हीच कला कौशल्य विकासाचे केंद्र…

‘आषाढीवारी भक्तीरंग कलाविष्कार सोहळ्यात अध्यक्षा भाग्यरेखा दळवी यांचे प्रतिपादन..

⚡कणकवली ता.०५-: शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव येथे शुक्रवारी आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी व अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीच्या अध्यक्षा भाग्यरेखा दळवी उपस्थित होत्या. या प्रसंगी त्यांनी शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या जीवनात कशा पद्धतीने उपयोग होतो याची माहिती दिली. शाळा हीच विद्यार्थ्यांच्या कला कौशल्य विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानामध्ये आषाढी वारी निमित्त रिंगण सोहळ्याचे आयोजन केले होते. या रिंगण सोहळ्याचे उद्घाटन भाग्यरेखा दळवी व शाळेचे मुख्याध्यापक मुकेश पवार यांच्या हस्ते झाले.

शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. सर्व मुली नऊवारी साडी व सर्व मुले पांढरा कुर्ता आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून उपस्थित होते.
अंश तेली या विद्यार्थ्याने विठ्ठलाची आणि किमया सरंगले हिने रुक्मिणीची वेशभूषा परिधान केली होती.
रिंगण सोहळ्यामध्ये सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये रिंगण पूर्ण केले. तसेच तुळशी , कळशी डोक्यावर घेऊन सर्व मुलींनी विठुरायाला रिंगण पूर्ण केले . इयत्ता पाचवीच्या मुलींनी तसेच मुलांनी पताका घेऊन रिंगण सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी फुगड्या घालत, विठू नामाचा जयजयकार करून आपला आनंद व्यक्त केला. अभंगवाणी कार्यक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अंश तेली, हर्ष लाड, श्रीतेज गावकर, रिया गावकर, तनुज गावकर, श्रद्धा पवार, धनश्री शिरवडेकर, गौरी सावंत, सान्वी घाडीगावकर ,रूपल वर्दम, नेहल शिवडावकर, रमिला कुमारी, पूर्वा गावकर, हर्षाली लाड, श्रेयस जाधव, सेजल शिवडावकर यांनी आपल्या अभंगातून शालेय वाद्यवृंदाच्या साथीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .

सहाय्यक शिक्षक स्वप्निल तांबे यांनी आपल्या सुरेल अशा आवाजातून दोन अभंग सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. याप्रसंगी मुख्याध्यापक मुकेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल त्यांचे कौतुक केले. महाराष्ट्रातील भक्तिमय परंपरेतील आषाढी वारीचे महत्त्व स्पष्ट केले. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी वृक्ष दिंडीचेही आयोजन करण्यात आले होते. ही वृक्षदिंडी शाळेपासून शिवडाव ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धनासंदर्भात घोषणा देत ही दिंडी काढली .

कार्यक्रमाला रिया गोसावी, सतीश तवटे, गणेश वर्पे, भाग्यश्री पाताडे, स्वप्निल तांबे उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक डॉ. के. आर. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री शिरवडेकर व प्रांजना गावकर यांनी केले. आभार रिया गावकर हिने मानले.

You cannot copy content of this page