ए आय बाबत जिल्हा प्रशासन आणि मार्बल यांच्यात सामंजस्य करार…

सिंधुदुर्ग राज्यातील अधिकृत पहिला ए आय युक्त ठरला जिल्हा:पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती..

ओरोस ता ५
जिल्हा प्रशासन आणि मार्बल यांच्यात एआय बाबत सामंजस्य करार करण्यास राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार आज सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अधिकृतरित्या राज्यातील पहिला जिल्हा एआय युक्त झाला आहे. यानंतर राज्यात जे जिल्हे ए आय करायचे असतील त्यांना पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात याबाबत केलेल्या कामाचा अभ्यास करावा लागेल. हे आपल्या जिल्ह्यासाठी भूषणावह आहे, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
जिल्हाधिकारी बैठक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री राणे यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, मार्बल कंपनीचे हर्ष पोतदार आणि साई कृष्णन यांच्यासह विविध खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी बदली होवून गेलेले या प्रकल्पाचे समन्वयक तथा अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले ऑनलाईन द्वारे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री राणे यांनी, १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा ए आय युक्त आपण जाहीर केला होता. आरोग्य, कृषी, पोलीस आणि आरटीओ हे चार विभाग एआय तंत्रज्ञानाला जोडण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मार्बल आणि जिल्हा प्रशासन यांच्यात सामंजस्य करार करण्यासाठी मान्यता देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चस्तरीय समितीने बैठक घेत यासाठी मान्यता दिली आहे. ही मान्यता मिळाल्याने जिल्हा प्रशासनाला राज्यातील पहिला एआय युक्त जिल्हा म्हणून मान्यता मिळाली आहे. ही बाब खूपच कौतुकास्पद आहे, असे सांगितले.

You cannot copy content of this page