सिंधुदुर्गातील ६ वी ते ११ वी च्या सर्व रिक्त जागा प्रणालीवर तात्काळ दाखवा…
शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात एल्गार; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन… सिंधुदुर्गनगरी, ता.११: राज्य शासनाच्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत ‘पवित्र’ प्रणालीवर प्राधान्यक्रम नोंदवताना निर्माण झालेल्या गंभीर तांत्रिक अडचणींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो पात्र बी.एड. आणि अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण उमेदवार तीव्र चिंतेत सापडले आहेत. या संकेतस्थळावर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे योग्य रीतीने दर्शवली जात नसल्याने स्थानिक उमेदवारांवर बेरोजगारीची टांगती तलवार…
