Headlines

सिंधुदुर्गात १५ दिवसांत १० हजार वनराई बंधारे उभारणार…

अणाव येथून विशेष पाणी संवर्धन मोहिमेला प्रारंभ:लोकसहभागातून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न.. ⚡कुडाळ ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर १’ अंतर्गत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. येत्या १५ दिवसांत जिल्ह्यात तब्बल १० हजार वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, या मोहिमेचा शुभारंभ अणाव…

Read Full News

१७४३ आंबा-काजू बागायतदारांच्या खात्यावर ३ कोटी ९४ लाखांची नुकसान भरपाई जमा

सिंधुदुर्ग, दि. २९ (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, दि. २८ सप्टेंबर २०२६ अखेर आणखी १ हजार ७४३ आंबा-काजू बागायतदारांच्या बँक खात्यावर ३ कोटी ९४ लाख ८ हजार २५१ रुपये नुकसान भरपाई जमा झाली आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत नुकसान भरपाई मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या २८…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ आपत्तीबाबत सात ठिकाणी रंगीत तालीम

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन सिंधुदुर्ग, दि. २९ (जिमाका): चक्रीवादळ आणि त्यातून उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या परिस्थितीत विविध शासकीय यंत्रणांचा समन्वय, बचाव व मदतकार्याची तयारी आणि आपत्कालीन प्रतिसादाची कार्यक्षमता तपासण्यासाठी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांच्या संयुक्त सहभागातून १ ऑक्टोबर २०२६ रोजी बहुराज्यीय रंगीत तालीम आयोजित होत आहे. सिंधुदुर्ग…

Read Full News

भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानांतर्गत कणकवलीत शिबिर…

विविध प्रमाणपत्रांचे वितरण; लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी.. ⚡सिंधुदुर्ग, दि. २९-: ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना व प्रमाणपत्रांचा लाभ मिळवून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ विशेष मोहिमेअंतर्गत कणकवली येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले तसेच आधारकार्ड,…

Read Full News

जीवनदीप योजनेतून आरोग्यासोबत आर्थिक सुरक्षेची साथ…

IPPB-Niva Bupaची विशेष आरोग्य विमा योजना; रुपये १४९ पासून विमा संरक्षण.. ⚡सिंधुदुर्ग,ता.२९-: गंभीर आजाराच्या काळात उपचारांसोबत आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि Niva Bupa Health Insurance यांच्या सहकार्याने ग्राहकांसाठी ‘जीवनदीप’ आरोग्य विमा योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १ लाख, ३ लाख आणि ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण…

Read Full News

नशामुक्तीसाठी जिल्ह्यात व्यापक मोहीम; शाळा-महाविद्यालयांत होणार अचानक तपासणी

एमआयडीसी, निर्जन ठिकाणांवरील उद्योग, कारखाने याठिकाणांचाही समावेश; नवरात्रीत जनजागृतीवर विशेष भर सिंधुदुर्ग, दि.२९ : जिल्ह्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थ व व्यसनांच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी नशामुक्ती अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली नशामुक्तीशी संबंधित वेगवेगळ्या मात्र एकसमान विषयाच्या तीन महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या. या…

Read Full News

मळेवाड मतदारसंघात बंधाऱ्यांची संख्या वाढवा…

भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी आताच नियोजनाची गरज : अपर्णा सातोसकर.. ⚡बांदा ता.२९-:मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांमध्ये भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता, जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. मतदारसंघातील उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी जास्तीत जास्त बंधारे उभारण्याची गरज असून, यासाठी आतापासूनच ठोस पावले उचलली पाहिजेत, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर यांनी केले.पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात…

Read Full News

अंगारक संकष्टीला बाष्पाला सहस्र मोदकांचा नैवेद्य…

⚡सावंतवाडी ता.२९-: अंगारक चतुर्थीच्या दिवशी शहरातील २१ दिवस विराजमान सार्वजनिक गणपतीला भक्तांकडून दरवर्षी सहस्र मोदक नैवेद्य अर्पण केला जातो. यावर्षी देखील वैश्यवाडा व उभाबाजार येथील हनुमान मंदिरात विराजमान श्रींना सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यानिमित्ताने अथर्वशीर्ष पठणासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. वैश्यवाडा सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदिरात अंगारक संकष्टी निमित्त…

Read Full News

झोळंबेचे डाकपाल कार्तिक जारवाल यांचा डाक विभागातर्फे विशेष सन्मान…

⚡बांदा ता.२९-: ग्रामीण भागात उत्कृष्ट सेवा बजावत विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना डाक विभागाच्या सेवांशी जोडल्याबद्दल झोळंबे शाखेचे डाकपाल कार्तिक गिरजाराम जारवाल यांचा भारतीय डाक विभागातर्फे विशेष सन्मान करण्यात आला.भारतीय डाक विभागातर्फे आयोजित ग्रामीण डाक सेवकांच्या संमेलनात हा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र व गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या हस्ते कार्तिक जारवाल यांना गौरविण्यात…

Read Full News

खालची सटमटवाडीत नव्या ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण…

कमी वीजदाबाच्या समस्येतून ग्रामस्थांची होणार सुटका; मनीष दळवी यांच्या हस्ते लोकार्पण.. ⚡बांदा ता.२९-: बांदा खालची सटमटवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते उत्साहात झाला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व सिंधुदुर्ग भाजप महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन…

Read Full News

You cannot copy content of this page