मुक्ताई ॲकेडमीची “आवाज व अभिनय” कार्यशाळा उत्साहात संपन्न…
⚡सावंतवाडी ता.०५-; मुक्ताई ॲकेडमी, सावंतवाडी आणि व्हिजन, मुंबई यांच्यातर्फे शालेय विदयार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या “आवाज व अभिनय” कार्यशाळेला जिल्ह्यातील विदयार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली येथील पहीली ते दहावीतील तब्बल अठ्ठेचाळीस मुला-मुलींनी कार्यशाळेत सहभाग घेतला.या चार दिवशीय कार्यशाळेचे आयोजन सावंतवाडी येथील श्री.पंचम खेमराज महाविदयालयाच्या सभागृहात करण्यात आले.कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक…
