महेश सारंग यांच्याकडून स्वागत: शहराच्या विकासासंदर्भात झाली चर्चा..
⚡सावंतवाडी ता.२६-: भारतीय जनता पक्षातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनी आज प्रथमच भाजपच्या शहर मध्यवर्ती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तसेच जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करत अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना श्री. सारंग यांनी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला. पक्षातर्फे सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या भेटीदरम्यान शहर विकासासंदर्भातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
