शंभर वर्षांची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे…

शिक्षणाधिकारी कविता शिंपी:संयुक्त स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

मालवण दि प्रतिनिधी

वराडकर हायस्कुल कट्टाच्या शतकी वाटचालीत शतकोत्तर ज्ञानदानाची सेवा करून जो होणारा आनंद होता तो आपल्या पूर्वजांनी घेतला आहे आणि शतकानंतर तो आनंद आपण अनुभवत आहोत, हि अभिमानाची गोष्ट आहे. शाळेच्या उज्वल वाटचालीत सर्वांनी योगदान दिले आहे. शंभर वर्षानंतर या शाळेला जी उर्जितावस्था आली आहे ती शाळेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी कारणीभूत ठरतानाच आपल्या शाळेचा गौरव होण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांनी येथे बोलताना केले

कट्टा येथील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल आणि जूनियर कॉलेज कट्टा वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा आणि डॉक्टर दादासाहेब वराडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय कट्टा यांचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ सिंधुदुर्ग च्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांच्या उपस्थितीत आणि संस्थेचे अध्यक्ष अजय राज वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मालवणचे गटविकास अधिकारी श्री श्याम चव्हाण हे उपस्थित होते

यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक व विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे, खजिनदार शाम पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, संचालिका स्वाती वराडकर, संचालक महेश वाईरकर, उपसरपंच आबा कामतेकर मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी पर्यवेक्षक महेश भाट यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. प्रारंभी प्रशालीचे प्रशालीच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले

यावेळी संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर म्हणाले, स्नेहसंमेलनाच्या कार्यकमात विद्यार्थ्यांनी सुंदर काम करत आपल्या गुणांचे दर्शन घडविले. आपली संस्था कट्टा दशक्रोशीतील मुलांसाठी जे काही कार्य करत आहे, त्याची प्रचिती विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणातून दिसून आला. याचे श्रेय शाळेतील शिक्षकांना जाते. शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी मोठी मेहनत घेतली आहे. शिक्षकांनी असेच टीमवर्कप्रमाणे कम करत राहावे, असे आवाहन त्यांनी केले तर प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी वराडकर हायस्कुलची शंभर वर्षांची वाटचाल कौतुकास्पद आहे. या संस्थेने आपला उत्तम शैक्षणिक दर्जा आजही टिकवून ठेवला आहे. यासाठी संस्था पदाधिकारी, शिक्षक मेहनत घेत आहेत. मेहनतीने एखादी संस्था उभारणे आणि ती इतकी वर्षे यशस्वीरित्या चालविणे आव्हानात्मक आहे, यामागे वराडकर कुटुंबियांचे कार्य मोठे आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेऊन जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी असे अधिकारी बनून आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवावा, यासाठी विद्यार्थी व पालकांनी श्रम घ्यावेत, असेही श्याम चव्हाण म्हणाले.

यावेळी दशावतारी कलावंत अक्षय नाईक, प्रशांत मयेकर महेंद्र कुडव बंटी कांबळी, नृत्यदिग्दर्शक अरविंद वराडकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त बनविण्यात आलेल्या संस्थेच्या लोगोचे अनावरण शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सूत्रसंचालन संजय पेंडुरकर आणि सौ वीणा शिरोडकर यांनी केली यावेळी तिन ही शाखांमधील पाचशे विद्यार्थ्यांचा समावेश असलेला दशावतार हे महानाट्य सादर करण्यात आले त्याला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला

You cannot copy content of this page