⚡सावंतवाडी ता.२६- : सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी आज शहरातील जगन्नाथ भोसले उद्यानाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान उद्यानातील विविध समस्या व सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उद्यानातील स्वच्छता, देखभाल, तसेच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा कशा देता येतील, याबाबत युवराज लखमराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. उद्यान अधिक सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
