सावंतवाडीतील सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्तीबाबत निर्णय सोमवारपर्यंत…

प्रवीण भोसले यांनी लक्ष वेधल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच आश्वासन..

⚡ सावंतवाडी ता.२६-:
सावंतवाडी नगर परिषदेमधील सफाई कामगारांच्या वारसांना उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार तसेच लाड–पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे नियुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नगरपालिका एम्प्लॉईज युनियन कोकण विभाग अध्यक्ष संतोष पवार व सफाई कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे भेट देत निवेदन सादर केले.

यावेळी सफाई कामगार युनियनचे प्रतिनिधी सुनील परब, गोपाल सावंत, संदीप पाटील, नितीन कदम, नारायण राऊळ, स्वीय सहायक मनोज वाघमोरे तसेच साबाजी मांजरेकर उपस्थित होते.

दरम्यान जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सोमवारी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, नगर विकास सहआयुक्त व सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सावंतवाडी नगरपालिकेतील 17 सफाई कामगारांच्या वारसांना न्याय देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान,जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या विषयावर तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल सफाई कामगारांच्या वारसांनी समाधान व्यक्त केले आहे.या चर्चेदरम्यान नगर विकास सहआयुक्त विनायक औधकर हेही उपस्थित होते.

You cannot copy content of this page