Headlines

पोलीस स्थापना दिनानिमित्त आरोंदा प्राथमिक शाळेत मुलांना शस्त्र हाताळण्याचे धडे…

⚡सावंतवाडी ता.०७-: जि.प.पूर्ण प्राथमिक आरोंदा नंबर १ येथे “पोलीस स्थापना दिना”चे औचित्य साधून “पोलीस स्थापना दिन” साजरा करण्यात आला.यावेळी पोलीस स्थापना दिनाचे महत्व व पोलीस शस्त्रांची माहिती मुलांना देण्यात आली. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,आरोंदा दूरक्षेत्र महेश अरवारी,कॉन्स्टेबल बाबूराव जाधव ,यांचे मार्गदर्शना खाली सदरील शस्त्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक, कॉन्स्टेबल आरोंदा आशिष सापळे ,संदीप झेंडेपोलीस…

Read Full News

जिल्हा रुग्णालयात कर्करोग तपासणी शिबीर; ९४ रुग्णांची तपासणी…

⚡ओरोस ता ७-: कर्करोगाच्या निदानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कॅन्सर व्हॅन दाखल झालेली आहे. या अंतर्गत बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात कर्करोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते फीत कापून या शिबीराचे उ‌द्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्जुन नरोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई…

Read Full News

रानबांबुळी गावाचा सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीत समावेश नको…

ग्रामसभेत एकमताने ठराव: विविध विकास कामांवर झाली चर्चा.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता ७-: जिल्हा मुख्यालयासह धरण आणि रेल्वेसाठी सर्वाधिक जागा रानबांबुळी गावाचीच संपादित झाली आहे. त्यामुळे रानबांबुळी गावाचा सिंधुदुर्गनगरी नगरपंचायती मध्ये समावेश न करता ऐतिहासिक वारसा असलेल्या रानबांबुळी गाव वगळून सिंधुदुर्ग नगरी नगरपंचायत करा.तसेच ७७ हेक्टर क्षेत्रातील विकसीत झोन वगळावा, रानबाबुळी गावाचा नगरपंचायत मध्ये समावेश करण्यास आमचा…

Read Full News

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु…

⚡सिंधुदुर्गनगरी ता ७-: शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत प्रशासनाकडून चाल ढखल केली जात असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग च्या वतीने आजपासून शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाचे अनेकवेळा लक्ष वेधूनही शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्याकड़े प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे…

Read Full News

तुळस येथे७ ते ११ जानेवारी दरम्यान दशावतार महोत्सव…

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्या वतीने १२ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ‘अश्वमेध तुळस महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ७ जानेवारी ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत श्री वेताळ मंदिर, तुळस – खरीवाडा येथील भव्य पटांगणावर संपन्न होणार आहे. या महोत्सवात कोकणची समृद्ध लोककला असलेल्या दशावतार नाट्यप्रकारासह विविध…

Read Full News

मठ श्री देव अनभवनेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव 8 जानेवारी रोजी…

⚡वेंगुर्ला ता.०७-: तालुक्यातील मठ गावठणवाडी येथील प्रमुख दैवत श्री देव अनभवनेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार 8 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. यनिमित्त सकाळी पूजन, केळी – नारळ ठेवणे, श्री सत्यनारायण महापूजा, रात्री 9.30 वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी व ग्रामस्थांनी दर्शनासह जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सतयेकर गावडे, वेतोरे मिरमेकर गावडे…

Read Full News

चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधेमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ होईल…

बाबा मोंडकर: खासदार नारायण राणें,पालकमंत्री नितेश राणे यांचे मानले आभार.. ⚡मालवण ता.०७-:चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे व पालकमंत्री नीतेश राणे यांचे पर्यटन व्यावसायिक महासंघाने आभार मानत असून त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात वाढ होणार आहे, असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा…

Read Full News

ओझर विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

⚡मालवण ता.०७-:मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पंचायत समिती मालवणचे माजी सभापती उदय परब, उद्घाटक माजी मुख्याध्यापिका उषा मुरवणे व प्रमुख पाहुण्या माजी मुख्याध्यापिका सौ. शोभा पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उषा मुरवणे…

Read Full News

दीप्ती दवे मेमोरियल जिल्हास्तरीय टेबलटेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत मालवणच्या ईशांत वेंगुर्लेकरला दुहेरी मुकुट…

⚡मालवण ता.०७-:महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोरगांवकर मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण येथील श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉलमध्ये दीप्ती दवे मेमोरियल टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मालवण,कणकवली, कुडाळ , वेंगुर्ले,सावंतवाडी येथील ३८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मालवणच्या…

Read Full News

मुख्य बाजारपेठेतील गढूळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी…

नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या ७ दिवसांत लाईन बदलली; १० कुटुंबांना मंगळवारपासून स्वच्छ पाणीपुरवठा सुरू.. ⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत होता. मुख्य बाजारपेठेतून ही नळपाण्याची लाईन गेली होती. निवडणुक प्रचारावेळी याबाबत नागरिकांनी आपल गाऱ्हाणे मांडले होत. यानंतर श्री‌.देव्या सुर्याजी यांनी तात्काळ प्रशासनाला कल्पना दिली होती. प्रभाग ६ चे…

Read Full News

You cannot copy content of this page