पोलीस स्थापना दिनानिमित्त आरोंदा प्राथमिक शाळेत मुलांना शस्त्र हाताळण्याचे धडे…

⚡सावंतवाडी ता.०७-: जि.प.पूर्ण प्राथमिक आरोंदा नंबर १ येथे “पोलीस स्थापना दिना”चे औचित्य साधून “पोलीस स्थापना दिन” साजरा करण्यात आला.यावेळी पोलीस स्थापना दिनाचे महत्व व पोलीस शस्त्रांची माहिती मुलांना देण्यात आली.

सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,आरोंदा दूरक्षेत्र महेश अरवारी,कॉन्स्टेबल बाबूराव जाधव ,यांचे मार्गदर्शना खाली सदरील शस्त्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक, कॉन्स्टेबल आरोंदा आशिष सापळे ,संदीप झेंडे
पोलीस पाटील जितेंद्र जाधव
यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांना देण्यात आले.
बंदूक कशी लोड करावी, कोणत्या पद्धतीने हाताळावी, तसेच बंदुकीची रेंज, शत्रूचा नेम कोणत्या पद्धतीने धरावा याची माहिती उपस्थित पोलिसांनी दिली.
यावेळी मुलांनी शस्त्राची माहिती घेत शस्त्र हाताळण्याचे प्रात्यक्षिक करून बघितले.
शाळेचे मुख्याध्यापक गणपत गावडे यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी निंगोजी कोकितकर, ऋतुजा राणे,नूतन निऊंगरे,विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षक निंगोजी कोकितकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

You cannot copy content of this page