शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु…

⚡सिंधुदुर्गनगरी ता ७-: शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत प्रशासनाकडून चाल ढखल केली जात असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग च्या वतीने आजपासून शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद प्रशासनाचे अनेकवेळा लक्ष वेधूनही शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्याकड़े प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे . काही प्रश्न तातडीने सोडविण्याची हमी देऊनही अद्याप एकही प्रश्न सोडविलेला नाही याबाबत शिक्षकामध्ये नाराजी आहे .प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुलक्ष होत असल्याने लक्ष वेधण्यासाठी आजपासून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोरच प्राथमिक शिक्षक समितीने बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे .

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न

२००५ पूर्वीच्या शासन अधिसूचनेनुसार सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे ,
२००५ पूर्वीच्या शिक्षण सेवकांची डी सी पी एस खाती जमा असलेली रक्कम सहाव्या वेतन आयोगाच्या १ ते ५ हप्त्याच्या फरकाची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्ग करणे ,
निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी चे प्रस्ताव विना विलंब मंजूर करणे ,
पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांचे प्रमोशन करणे,
शिक्षक प्रशिक्षण हे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर जूनच्या ३० तारीख पर्यंत पहिले सत्र व दुसरे सत्र दिवाळी सुट्टी संपल्यानंतर नजिकच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये तसेच उर्वरित प्रशिक्षण एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात यावे,
भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा बीट स्तरावर घ्यावी,
शिक्षण सेवक कार्यकाल पूर्ण झालेल्या शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करावी,
शालेय वेळ पूर्वीप्रमाणे १०.३० ते ४.३० व शनिवार ७.३० ते १०.३० असा बदल करावा ,
स्थायी आदेश प्रस्ताव मंजूर करण्यात यावा,
सन २०२० मध्ये मंजूर झालेल्या चटोपाध्याय वेतनश्रेणीचा फरक तात्काळ मिळावा,
विद्यार्थ्यांसाठी प्राप्त होणाऱ्या विविध शिष्यवृत्तीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी,
दिव्यांग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी तयार करावी.,
३ ते ४ वर्ष प्रलंबित असलेली मेडिकल बिले मंजूर करून मिळणे,
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव वेळीच मंजूर करून मिळावेत,
पवित्र पोर्टलद्वारे भरती झालेल्या नवनियुक्त उपशिक्षक पदवीधर शिक्षक यांची सेवाज्येष्ठता यादी जाहीर करावी,यासह एकूण ३६ मागण्या या आंदोलनातून मांडल्या आहेत.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर चंद्रसेन पाताडे चंद्रकांत आणावकर तुषार आरोलकर नामदेव जांभवडेकर संतोष परब निकिता ठाकूर राजू वजराटकर प्रशांत मडगावकर आधी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले आहेत.

You cannot copy content of this page