⚡वेंगुर्ला ता.०७-: वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्या वतीने १२ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या ‘अश्वमेध तुळस महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ७ जानेवारी ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत श्री वेताळ मंदिर, तुळस – खरीवाडा येथील भव्य पटांगणावर संपन्न होणार आहे. या महोत्सवात कोकणची समृद्ध लोककला असलेल्या दशावतार नाट्यप्रकारासह विविध सांस्कृतिक स्पर्धांची रेलचेल रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.दशावतार नाट्यमहोत्सव (७ ते ९ जानेवारी)
दशावतार रसिकांसाठी सलग तीन दिवस नामवंत नाट्यमंडळांची दर्जेदार नाटके रोज सायंकाळी ७ वा. सादर होणार आहेत. बुधवार, दि. ७ जानेवारी रोजी
श्री देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ – ‘धुंडीराज गणेश’. गुरुवार, दि. ८ जानेवारी रोजी
नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड – ‘निलमाधव’. शुक्रवार, दि. ९ जानेवारी रोजी दत्तमाऊली दशावतार लोककला नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग –
‘वस्त्रात अडकले ब्रह्मरेत, जन्मास आले शिवतेज’.
शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी सायं. ६.३० वाजता पूर्व प्राथमिक शाळांसाठी समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तसेच इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे –
समूह गीतगायन,समूह नृत्य, सोलो डान्स, प्रश्नमंजुषा, रामायण–महाभारत कालीन व्यक्तिरेखा अभिनय स्पर्धा आणि
या सर्व स्पर्धांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या प्रशालेला मानाचा ‘श्री वेताळ करंडक २०२६’ प्रदान करण्यात येणार आहे. रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सायं. ७ वाजता महोत्सवाच्या समारोपप्रसंगी दोन प्रमुख नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
खुली ग्रुप डान्स स्पर्धा
(किमान ६ स्पर्धक | सादरीकरण वेळ : १० मिनिटे).
प्रथम पारितोषिक: ७,००० रुपये + चषक + प्रमाणपत्र
द्वितीय: ५,००० रुपये + चषक + प्रमाणपत्र
तृतीय: ३,००० रुपये + चषक + प्रमाणपत्र.
उत्तेजनार्थ (२): चषक + प्रमाणपत्र. खुली नात्यातील जोडी नृत्य स्पर्धा
(पती–पत्नी, आई/वडील–मुलगा/मुलगी, भाऊ–बहिण, आजी/आजोबा–नातवंडे अशाप्रकारे) सादरीकरण वेळ : कमाल ५ मिनिटे).
प्रथम पारितोषिक: २,००० रुपये + चषक + प्रमाणपत्र
द्वितीय : १,५०० रुपये + चषक + प्रमाणपत्र.
तृतीय: १,००० रुपये + चषक + प्रमाणपत्र.
उत्तेजनार्थ (२): प्रत्येकी ५०० रुपये + चषक + प्रमाणपत्र.
याच दिवशी पारितोषिक वितरण समारंभ तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या बहुरंगी सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ रसिक प्रेक्षकांनी घ्यावा, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी श विवेक तिरोडकर व डॉ. सचिन परुळकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तुळस येथे७ ते ११ जानेवारी दरम्यान दशावतार महोत्सव…
