⚡वेंगुर्ला ता.०७-: तालुक्यातील मठ गावठणवाडी येथील प्रमुख दैवत श्री देव अनभवनेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार 8 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. यनिमित्त सकाळी पूजन, केळी – नारळ ठेवणे, श्री सत्यनारायण महापूजा, रात्री 9.30 वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी व ग्रामस्थांनी दर्शनासह जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सतयेकर गावडे, वेतोरे मिरमेकर गावडे व मेस्त्री परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
मठ श्री देव अनभवनेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव 8 जानेवारी रोजी…
