Headlines

ओंकार हत्तीला वनतारात पाठवा…

पालकमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करावा:माजी जि.प. सभापती मंगेश तळवणेकर यांची पालकमंत्री नितेश राणेंकडे मागणी.. ⚡सावंतवाडी,ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओंकार हत्तीचे होत असलेले हाल पाहून दुःख होत असून, ओंकार हा आमच्यासाठी दैवतासमान आहे. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे वनतारात पाठविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे…

Read Full News

वाढीव वीज बिल आणि स्मार्ट मीटरविरोधात कवठी ग्रामस्थ आक्रमक

जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट कुडाळ : वाढीव वीज बिल आणि स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारींसंदर्भात कवठी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या विविध तक्रारी मांडत सविस्तर चर्चा केली.स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होत असल्याच्या तक्रारींसह ग्रामस्थांनी आपल्या शंकांचे निरसन करण्याची…

Read Full News

पुष्पसेन ज्ञानपीठात रोजगार महामेळावा उत्साहात संपन्न

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत ६० उमेदवारांचा सहभाग कुडाळ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय व नर्सिंग विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत रोजगार महामेळाव्याचे आयोजन पुष्पसेन ज्ञानपीठ येथे करण्यात आले.बया मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी राजेंद्र परब, गीता काळे, इंद्रायणी शिक्षण प्रसारक…

Read Full News

भाजपची आज सायंकाळी तातडीची बैठक..

भाजप जनसंपर्क कार्यालयात सायंकाळी पाच वाजता बैठक: तर साडेपाच वाजता पत्रकार परिषद.. ⚡सावंतवाडी ता. ०१-: सावंतवाडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आणि पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर…

Read Full News

सावंतवाडी नगरपालिका दवाखाना पुन्हा होणार कार्यान्वित…

‘नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रा’तून नागरिकांना मिळणार आरोग्य सेवा; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून पाहणी.. ⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी नगरपालिकेचा दवाखाना कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नये, यासाठी नगराध्यक्ष श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनीही यासाठी प्रयत्न केले. नगराध्यक्षांच्या मागणी पत्राच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी आरोग्य विभागाच्या पथकासह…

Read Full News

कुडाळच्या जुन्या कोर्ट जागेत ‘संभाजी महाराज संग्रहालय’ उभारा…

सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; ऐतिहासिक वारसा जतनासह पर्यटनवृद्धीचा उद्देश.. ⚡ओरोस, ता. १-: कुडाळ येथील सध्याचे न्यायालय अन्यत्र स्थलांतरित झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेत छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र, पराक्रम आणि इतिहासाचे दर्शन घडविणारे संग्रहालय उभारावे, अशी मागणी सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्ट, कुडाळच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासाठी शासनाने प्रशासकीय तसेच आर्थिक सहकार्य करावे, अशी…

Read Full News

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत आरोही हंकारे तृतीय..

‘महाराणी ताराबाई भोसले’ विषयावरील निबंधासाठी मिळविला बहुमान.. ⚡कणकवली ता.०१-: जवाहर नवोदय विद्यालय, सावंतवाडी येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या कु. आरोही श्रीकांत हंकारे हिने लाख मराठा प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेसाठी ‘महाराणी ताराबाई भोसले’ हा विषय देण्यात आला होता. राज्यभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी…

Read Full News

गुरु मठकर यांच्याकडून निलेश राणेंच्या दीर्घायुष्यासाठी दैवज्ञ गणपती मंदिरात अभिषेक…

⚡कुडाळ ता.०१-: अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गुरु मठकर यांच्याकडून कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या नावाने दैवज्ञ गणपती मंदिरातील चांदीच्या गणेशमूर्तीवर विधिवत अभिषेक करण्यात आला. यावेळी निलेश राणे यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावे तसेच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करण्यात आली. पुढील गणेश चतुर्थीपूर्वी निलेश राणे यांना मंत्रिपद मिळावे, अशी मनोकामनाही यावेळी व्यक्त…

Read Full News

खासदार नारायण राणें विरोधात माजी खासदार विनायक राऊत न्यायालयातही पराभूत…

खासदार राणेंच्या विजयाला आव्हान देणारी राऊत यांची निवडणूक याचिका न्यायालयाने फेटाळली:मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिला निर्णय… ⚡सिंधुदुर्ग दि.०१-: माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या विरोधातील विनायक राऊत यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील खासदार राणेंच्या विजयाला आव्हान देत माजी खासदार विनायक राऊत यांनी दाखल…

Read Full News

*शेकडो विद्यार्थ्यांसोबत एकाचवेळी बुद्धिबळाचा डाव…

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे यांचा भोसले सैनिक स्कूलमध्ये अनोखा ‘सायमल्टेनियस चेस’ उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.०१-: बुद्धिबळाच्या पटावर एकाचवेळी शेकडो खेळाडूंना आव्हान देत, प्रत्येक पटावरील डावावर लक्ष ठेवत बुद्धिबळाचा थरार निर्माण करणारे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आणि चेस चॅलेंजर अकॅडमीचे संस्थापक शरद वझे आज १ ऑक्टोबर रोजी यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळ खेळणार आहेत. सकाळी १० वाजता…

Read Full News

You cannot copy content of this page