Headlines

नाम. नितेश राणे गुरुवारी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.१३-: महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे गुरुवारी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर दौऱ्यावर येत आहेत. नाम. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, १३ ऑगस्ट रोजी रात्रौ १०:४५ वा. मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण, रात्रौ ११:०५ वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे…

Read More

सह्याद्रीचा कणखर सुपुत्र गोविंद गावडेंचा सार्थ अभिमान…

दिनेश गावडे यांच्याकडून विशेष अभिनंदन.. ⚡सावंतवाडी ता.१३-: गोविंद गावडे यांनी ‘आशिया पॅसिफिक ग्लोबल रेकॉर्ड’ यात सातत्याने आठ तास 25 मिनिटे शिवतांडव स्तोत्रावर तबलावादन करून एक नवा विक्रम रचला आहे. आमच्या सह्याद्री पट्ट्यातील आंबोली गावाचा हा सुपुत्र असल्यामुळे साहजिकच आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान असून त्यामुळे आंबोली आणि पंचक्रोशीचे नाव जगभरात पोहोचले आहे. गोविंद गावडे यांच्या पुढील…

Read More

कणकवलीत BSNL नेटवर्क गुल्ल…

कणकवली : तालुक्यातील BSNL नेटवर्क बुधवारी सकाळपासून गुल्ल झाले आहे. आठवड्यातून किमान चार दिवस असे प्रकार होतच असतात. नेटवर्क सेवा सुरळीत करण्याची मागणी होत असतानाच दिवसेंदिवस BSNL नेटवर्क मात्र अधोगतिकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येते. ऐन सनासुतीचे दिवस असतानाच BSNL नेटवर्क गुल्ल होत असल्याने नेटवर्क वापरकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी बीएसएनएल सेवा…

Read More

सावंतवाडी शहर भाजप मंडला तर्फे स्वच्छता अभियान…!

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी शहर भाजप मंडला तर्फे स्मारक स्वच्छता अभियान शिवरामराजे भोसले पुतळा येथे करण्यात आले यावेळी सावंतवाडी शहर भाजप मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर,संजू शिरोडकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मेघना साळगांवकर, मेघा भोगटे, अमित गवडळकर, नागेश जगताप, हितेन नाईक, वैशाख मिशाळ,दत्तू नार्वेकर, तृप्ती विर्नोडकर, गणेश पडते, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.,.

Read More

खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बांदा पत्रादेवी रस्त्यावर दुचाकीच अपघात…

बांदा/प्रतिनिधीबांदा-पत्रादेवी रस्त्यावर रामनगर येथे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी अपघातग्रस्त होऊन चालक तुकाराम सावंत-पटेकर (रा. बांदा पानवळ) हा युवक जखमी झाला. युवकाच्या हाताला दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.बांदा पत्रादेवी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्याच्या डागडूजीची वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने नाराजी…

Read More

क्वांटम युगावर अद्विताचे दमदार वक्तृत्व, जिल्हास्तरीय फेरीत प्रवेश…

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी.. ⚡सावंतवाडी ता.१३-: शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.सिंधुदुर्ग, जिल्हा विज्ञान मंडळ आणि मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत झालेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी अद्विता दळवी हिने प्रथम क्रमांक मिळवला. ‘क्वांटम युगाची सुरुवात : संभाव्यता व आव्हाने’ हा या स्पर्धेचा…

Read More

बांदा येथे १८ ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिर…

⚡बांदा ता.१२-:कोंकण कॅन्सर ॲण्ड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मातृत्व मेडिकल बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा आणि ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत मातृत्व मेडिकल, बांदा (पोस्ट ऑफिसजवळ) येथे पार पडणार आहे. शिबिरात…

Read More

नेतर्डे गावात बीएसएनएलची सेवा सुरू…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे नेतर्डे वासियांनी मानले आभार.. ​बांदा/प्रतिनिधीवर्षभराच्या मागणीनंतर अखेर नेतर्डे गावामध्ये भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची मोबाईल सेवा सुरू झाली आहे. या सेवेमुळे येथील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या आदेशाने त्वरीत सेवा सुरू झाल्याबद्दल माजी सभापती प्रमोद कामत यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. नेतर्डे गावात…

Read More

स्वातंत्र दिनाच्या पूर्व संध्येला बांदा शहरात भव्य तिरंगा यात्रेचे नियोजन…

⚡बांदा ता.१२-:७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १४ रोजी बांदा येथे सर्व भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या तिरंगा यात्रेस छत्रपती शिवाजी महाराज पुतळा गडगेवाडी येथून दुपारी ३ वाजता सुरुवात होईल अशी माहिती भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.ही यात्रा श्रीराम चौक बांदा, हॉस्पिटल…

Read More

नेत्र तपासणी शिबिराचा १०७ जणांनी घेतला लाभ…

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्यातर्फे आयोजन.. ⚡मालवण ता.१२-:मालवणचे माजी नगरसेवक श्री. आप्पा लुडबे यांच्या वतीने वायरी मालवण येथील लोकनेते आर. जी. चव्हाण मंगल कार्यालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. या शिबिरात १०७ जणांची तपासणी करण्यात आली. या शिबिरा दरम्यान मालवण ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बालाजी पाटील, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. संतोष सावंत आणि…

Read More
You cannot copy content of this page