Headlines

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा-काजू शेतीला मिळणार ‘AI’ची साथ…

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून “कृत्रिम बुद्धिमत्तेवर” आधारित होणार शेती :आठही तालुक्यांत दोन वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प; ४०० शेतकऱ्यांचा सहभाग.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०२-:हवामान बदल, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार, वाढती आर्द्रता आणि कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत असताना आता सिंधुदुर्गातील फलोत्पादनाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत जिल्ह्यातील आठही…

Read Full News

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शारदा पोवार यांची वेंगुर्ला मठ सतये येथे भेट…

⚡वेंगुर्ला ता.०२-: सिंधुदुर्ग उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा DCSMH ऍप साठी वेंगुर्ला तालुका नोडल अधिकारी शारदा पोवार यांनी वेंगुर्ला मठ सतये येथे भेट देऊन DCSMH ऍप संदर्भात पाहणी व मार्गदर्शन केले. यावेळी वेंगुर्ला मंडळ अधिकारी विनायक कोदे, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग पटवर्धन, मठ तलाठी श्री. मोरे, सतये पोलीसपाटील शमिका धुरी, पीकपाहणी सहाय्यक स्वप्नील धुरी, सतये येथील शेतकरी, ग्रामस्थ…

Read Full News

वेंगुर्ला वेतोरे येथे विशाल परब यांच्यामार्फत आज जलसंधारणाचा शुभारंभ

वेंगुर्लादुष्काळाच्या संभाव्य सावटावर मात करण्यासाठी आणि पाण्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्यामार्फत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ५० वनराई बंधारे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या उपक्रमाचा भव्य शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे गावातील गुरव टेंबवाडी येथे युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे….

Read Full News

वायंगणी ग्रामपंचायत मार्फत बोलक्या भिंती रंगभरण जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत मार्फत महात्मा गांधी जयंती व स्वच्छता पंधरवडा निमितस्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वैशिष्ट्यपूर्ण“बोलक्या भिंती” रंगभरण जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वच्छता, स्वच्छ परिसर, प्लास्टिकमुक्ती, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन व नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करणारे संदेश भिंतीवर आकर्षक पद्धतीने रंगविणे आवश्यक आहे. यासाठी प्रथम पारितोषिक 10 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक…

Read Full News

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील जागा स्थानिक विक्रेत्यांनाच द्या…

परप्रांतीयांना जागा दिल्यास भाजप युवा मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा:स्थलांतराच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांच्या मोजक्या कार्यकर्त्यांना जागा वाटप होत असल्याचा आरोप.. ⚡कणकवली ता.०२-: शहरातील उड्डाणपुलाखाली भाजी, फुले व फळ विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत परप्रांतीय विक्रेत्यांना जागा न देता स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य द्यावे. स्थानिकांना डावलून परप्रांतीय विक्रेत्यांना जागा दिल्यास भाजप युवा मोर्चाच्या वतीने सत्ताधारी…

Read Full News

मालवण-देऊळवाडा व देवबाग येथील रस्त्यांची दुरुस्ती २ दिवसांत करा…

गॅरी अन्ननसिएशन ; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त… ⚡मालवण ता.०१-:मालवण शहरातील प्रमुख प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या देऊळवाडा परिसरासह पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या देवबाग परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या खराब रस्त्यांची येत्या दोन दिवसांत तातडीने दुरुस्ती न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतःच्या पद्धतीने हा प्रश्न हाताळेल आणि तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा…

Read Full News

वराड तलावाची आमदार निलेश राणे यांच्याकडून पाहणी

पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजनांचे निर्देश मालवण दि प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वराड तलावाची आमदार निलेश राणे यांनी पाहणी करून तलावाची सद्यस्थिती आणि पाणी साठवण क्षमतेचा आढावा घेतला. तलावात साचलेला गाळ उपसा करून पाणी साठवण क्षमता वाढविण्यासह आवश्यक दुरुस्ती व तांत्रिक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने लघु पाटबंधारे विभागासोबत बैठक घेऊन सविस्तर अहवाल तयार करावा, असे निर्देश…

Read Full News

९३ व्या वर्षीही सामाजिक कार्याची धग कायम;

दादासाहेब परळकर यांचा हेटकरी भंडारी समाज मंडळातर्फे सत्कार मालवण दि प्रतिनिधी “समाजातील होतकरू मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिलो असून, यापुढेही आपल्या परीने हे कार्य सुरू ठेवणार आहोत हेटकरी भंडारी समाज मंडळाने समाजातील होतकरू लोकांसाठी सुरु केलेले कार्य कौतुकास्पद असून मंडळाने सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची परंपरा यापुढेही अशीच जोपासावी, समाजहितासाठी विविध उपक्रम…

Read Full News

रोझरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छता अभियान…

चिवला बीच, फोवकांडा पिंपळ व जेटी बंदर परिसरात स्वच्छता; पथनाट्यातून जनजागृती ⚡मालवण ता.०१-: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रोझरी इंग्लिश स्कूल येथे विशेष स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. या अभियानात शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून संपूर्ण समाजाला स्वच्छतेचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. स्वच्छता अभियानादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी जाऊन परिसराची…

Read Full News

मालवण नगरपरिषदेतर्फे शहरात व्यापक स्वच्छता मोहीम

मालवण (प्रतिनिधी) नगरपरिषदेच्या वतीने ‘महास्वच्छता अभियान २०२६’, ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ व ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी, झाडी-झुडपांमध्ये तसेच संवेदनशील कांदळवन परिसरात साचलेला कचरा आणि प्लास्टिक कचरा हटविण्यात आला. नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत कचऱ्याचे…

Read Full News

You cannot copy content of this page