हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा निर्मितीत पालकमंत्री नितेश राणे यांचे श्रमदान
जिल्हावासियांना लोकसहभागातून जलसंवर्धनाचे आवाहन सिंधुदुर्ग, दि. ३ (जिमाका) : जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देत आगामी काळात दुष्काळाचे संकट कोणत्याही पिढीला भेडसावू नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रशासन चांगल्या प्रकारे काम करीत असून, नागरिकांनीही या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व…
