नौकेवर जात असताना पाण्यात पडून मच्छिमाराचा बुडून मृत्यू…
⚡देवगड ता.१८-:खाडीच्या पाण्यात असलेल्या मच्छिमारी नौकेवर किनाऱ्यावरून पाण्यातून चालत जात असताना आनंद अनिल चिंदरकर (३५), रा. जामसंडे भटवाडी यांचा तोल जाऊन खाडीच्या पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद चिंदरकर हे देवगड येथील उमेश बांदकर यांच्या मच्छिमारी पातीवर खलाशी म्हणून काम करत होते….
