Headlines

जिल्हा परिषद राबविणार ताप प्रतिबंधक मोहीम जिल्हा परिषद सदस्य गावोगावी जाऊन करणार जनजागृती

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात लेप्टोचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच जिल्ह्यात तापाचे रुग्ण सुद्धा वाढले आहेत. तापाच्या रुग्णाबाबत जिल्ह्यात गंभीर स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ‘ताप’ प्रतिबंध मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील ३५ आरोग्य केंद्राअंतर्गत ताप रुग्णाचा सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. कोरोनामुळे तापाचे रुग्ण टेस्ट करून घेण्यास घाबरत आहेत….

Read Full News

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्या मोर्चा….

*पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनीही सहभागी होण्याचे आशिष सुभेदार.यांनी केले आवाहन *💫सावंतवाडी दि.२५-:* जनतेला भेडसावणार्‍या प्रश्नासंदर्भात माजी आमदार तथा राज्यसरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे उद्या २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केले आहे. महाविकास…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज दोन कोरोना ग्रस्त रुग्णाचा मृत्यू

तालुक्यातील कोरोना रुग्णांची मृत्यू संख्या ४१ वर* सावंतवाडी दि.२५-:* तालुक्यात आज दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मळगाव व देवसू येथील हे दोघे असून दोघांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. परंतु आज दिवसभरामध्ये तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आला नाही. याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. सावंतवाडी तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे…

Read Full News

शहीद विजय साळसकर यांना शिवसेनेच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी श्रद्धांजली

स्मारकाची शिवसेना व ग्रामस्थांच्या श्रमदानातून साफ सफाई *💫वैभववाडी दि.२५-:* :26/11 रोजी दहशतवादी हल्ला मुंबई शहरात झाला.या हल्ल्यात कर्तव्यदक्ष अधिकारी विजय साळसकर हे शाहिद झाले.या घटनेला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत.26 नोव्हेंबर 2020 हा दिवस एडगाव येथील त्यांच्या स्मारकामध्ये वैभववाडी शिवसेनेच्या वतीने स्मृती म्हणून साजरा केला जाणार आहे .या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते,जिल्हा बँक…

Read Full News

सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे

*मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांचे नागरिकांना आवाहन *💫मालवण दि.२५-:* महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे. ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची घोर फसवणूक आहे. त्यामुळे सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केले आहे. कोरोना काळात अनेक व्यवसाय ठप्प होते….

Read Full News

रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर

रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनतर्फे आयोजन *💫वेंगुर्ला दि.२५-:* दिवाळी सणाचे औचित्य साधून रोटरॅक्ट क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्यावतीने रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सिद्धेश दाभोलकर, सिद्धी तुळसकर व विशाखा कुंभार यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. ही स्पर्धा रोटरॅक्टर साहिली निनावे व रोटरॅक्ट झोनल रिप्रेन्झेटेटिव्ह स्वप्निल परब यांच्या…

Read Full News

*… त्या चाकू हल्ला प्रकरणातील वडिलांना देखील जामीन मंजूर २५ हजाराचा जामीन करण्यात आला मंजूर*

*💫सावंतवाडी दि.२५-:* गाडी पार्कींग करण्याच्या वादातून घडलेल्या चाकू हल्ल्या प्रकरणी महेश दाभोलकर रा.सावंतवाडी याला आज जिल्हा न्यायालयाने 25 हजाराचा जामीन मंजूर केला याप्रकरणी अँड. सुहेब डिंगणकर यांनी काम पाहिले. सावंतवाडी शहरात ८ नोव्हेंबर रोजी रात्री सालईवाडा येथे गाडी पार्किंगवरुन महेश दाभोलकर व कुशल दाभोलकर या पिता पुत्रांनी शहरातीलच चेतन देउलकर आणि संतोष वागळे या दोघांवर…

Read Full News

देवगड-निपाणी रस्त्यावरील डागडूजी करा अन्यथा आंदोलन…!!

असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांचा इशारा; असलदे ते कोळोशी रस्ता वाहतुकीस धोकादायक.. *💫कणकवली दि.२५-:* देवगड-निपाणी राज्यमहामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. असलदे ते कोळोशी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून देखील कुठलीही दखल घेतली जात नाही. बांधकाम विभागाचे अधिकारी जीवितहानी झाल्यानंतर जागे होणार का?…

Read Full News

नरडवे धरण प्रकल्पग्रस्तावर अन्याय होत असेल तर खपवून घेणार नाही..

आमदार नितेश राणे यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना सुनावले; प्रकल्पग्रस्थ व अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक *💫कणकवली दि.२५-:* नरडवे धरण प्रकल्पातील एकाही प्रकल्पग्रस्थावर अन्याय होता नये. या मतदार संघाचा आमदार म्हणून प्रकल्पग्रस्थानच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे.पाटबंधारे विभागाने प्रकल्पग्रस्ताच्या तक्रारींचे निवारण योग्य पद्धतीने वेळेत करावे.प्रकल्पग्रस्थानच्या समस्या जोपर्यत सुटत नाहीत तो पर्यंत मी पाठवुराव करत राहीन मात्र मोबदला देण्याच्या…

Read Full News

जिल्ह्यात एकूण ४ हजार ८७१ जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या १८५ वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ८७१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page