नरडवे धरण प्रकल्पग्रस्तावर अन्याय होत असेल तर खपवून घेणार नाही..

आमदार नितेश राणे यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना सुनावले; प्रकल्पग्रस्थ व अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक

*💫कणकवली दि.२५-:* नरडवे धरण प्रकल्पातील एकाही प्रकल्पग्रस्थावर अन्याय होता नये. या मतदार संघाचा आमदार म्हणून प्रकल्पग्रस्थानच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे.पाटबंधारे विभागाने प्रकल्पग्रस्ताच्या तक्रारींचे निवारण योग्य पद्धतीने वेळेत करावे.प्रकल्पग्रस्थानच्या समस्या जोपर्यत सुटत नाहीत तो पर्यंत मी पाठवुराव करत राहीन मात्र मोबदला देण्याच्या कामात दिरंगायी नको,वेळकाढूपणा नको. धरणात घरे- गोठे,जमिनी आणि झाडे गेलेली आहेत.त्यांचे मूल्यांकन केलेले आहे.त्याचा योग्यमोबदला वेळेत द्या.त्यासाठी वेळकडूपणा नको अशी समज आमदार नितेश राणे यांनी आज पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. नरडवे प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत आज आमदार नितेश राणे यांनी आपल्या कार्यालयामध्ये प्रकल्पग्रस्त व अधिकारी वर्ग यांची संयुक्त बैठक घेतली.या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी व घरांचा मिळणारा मोबदला देण्यास होणारा विलंब तसेच त्यामध्ये संबंधित पाटबंधारे विभागाकडून होणारी चालढकल व अनियमितता अशा असंख्य तक्रारींचा पाढा प्रकल्पग्रस्तांनी मांडला. आमदार नितेश राणे यांनी प्रकल्पग्रस्त व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन करून या महिना अखेरपासून टप्प्या-टप्प्याने दरदिवशी ठराविक प्रकल्पग्रस्तांना आॅफिसला बोलावून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी पाटबंधारे खात्याचे अधिकारी श्री. कदम, श्री. यादव, श्री. माणगावकर हजर होते. तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत,नरडवे उपसरपंच सुरेश ढवळ, राजन कदम व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page