Headlines

आंबोली बसस्थानक आवारातील अज्ञात मोटारसायकल पोलिसांनी घेतल्या ताब्यात

*💫आंबोली विष्णू चव्हाण-:* आंबोली बसस्थानकाच्या आवारात अज्ञातांनी लावलेल्या दोन मोटारसायकल दोन दिवस झाले तरी त्या त्याच ठिकाणी असल्याने संशय आल्यावर ग्रामस्थांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी या मोटारसायकल ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात ठेवलेल्या आहेत. कुणाच्या असतील त्यांनी आंबोली पोलिसात संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे

Read Full News

विनामास्क फिरणार्‍यांवर बांद्यात दंडात्मक कारवाई…

*💫बांदा दि.२२-:* बांदा शहरात विना मास्क फिरणार्‍यांवर आज ग्रामपंचायत प्रशासन व पोलीसांनी संयुक्तपणे दंडात्मक कारवाई केली. अचानकपणे सुरु केलेल्या कारवाईमुळे आठवडा बाजारासाठी आलेल्या ग्राहकांची धांदल उडाली. आतापर्यंत सुमारे २० हून नागरिकांवर प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव राज्यात वेगाने होत असल्याने राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक…

Read Full News

आरोंदा येथे ४३० मिलीग्रॅम गांजा जप्त…

सावंतवाडी पोलिसांची कारवाई : कोल्हापुरच्या दोघांना ताब्यात_* *💫सावंतवाडी दि.२२-:* आरोंदा येथे सावंतवाडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा जप्त केला. या प्रकरणी कोल्हापुरच्या दोघांना ताब्यात घेतले. गोव्याहून रेनाॅल्ड डस्टर कारमधून गांजा घेऊन आरोंदामार्गे कोल्हापूरला रात्री बारा वाजता जात होते. पोलिसांनी आरोंदा दुरक्षेत्र येथे कारची तपासणी केली असता त्यात ४३० मिलीग्रॅम गांजा आढळला. ताब्यात घेण्यात आलेल्यांची मुबारक, सलीम…

Read Full News

प्रत्येक गावात अधिकारी निर्माण झाला पाहिजे-:मा.सत्यवान रेडकर….

*💫दोडामार्ग दि.२२ सुमित दळवी-:* गावा गावातुन शासकीय कर्मचारी आणि अधिकारी निर्माण झाले पाहिजेत म्हणून तिमिरातून तेजाकडे उपक्रमांतर्गत आज सरस्वती विद्या मंदिर कुडासे मध्ये भारत सरकार (मुंबई)मध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मा.सत्यवान रेडकर मुळगाव -सावंतवाडी यांनी कुडासे गावातील मुलांना भविष्यातील यशस्वी वाटचाल बाबत सखोल मार्गदर्शन केले. रेडकर सरांनी आपला प्रेरणादायीजीवनपट उलगडून सांगताना शासकीय अधिकारी का झालं…

Read Full News

नेमळे येथील श्री देव कलेश्वर-मलेश्वर पंचायतनाचा वर्धापनदिन सोहळा उद्यापासून…

गावमर्यादित मानकरी व ब्राम्हणांच्या उपस्थितीत कोरोनाच्या नियमांचे पालन करुन होणार साजरा *💫सावंतवाडी दि.२२सहदेव राऊळ-:* सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथील जागृत श्री देव कलेश्वर-मलेश्वर पंचायतनाचा वर्धापनदिन सोहळा मंगळवार २३ फेब्रुवारी ते गुरुवार २५ फेब्रुवारी या कालावधीत गावमर्यादित मानकरी व ब्राम्हण यांच्या उपस्थितीत कोविड-१ ९ नियमांचे पालन करुन साजरा होणार आहे. या निमित्ताने श्री देव मलेश्वर मंदिरामध्ये शिवमहिम्ना…

Read Full News

निलांग परिमल नाईक याची सिंधुदुर्ग जिल्हा खुल्या क्रिकेट संघात निवड

*💫सावंतवाडी दि.२२-:* नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचे सुपुत्र निलांग परिमल नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा खुल्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. तसेच १९ वर्षा खालील संघात देखील त्याची निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Read Full News

महाराष्ट्रात लॉकडाऊन लावायचा का….?

मुख्यमंत्र्यांचं जनतेला 8 दिवसांचं अल्टीमेटम *💫मुंबई दि.२३-:*  महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? हा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला थेट विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी रात्री सात वाजता संवाद साधला त्यावेळेस त्यांनी हा सवाल केला आहे. लॉकडाऊन लावायचा की नाही याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही तर तुम्हीच मला द्या असंही मुख्यमंत्री म्हणाले. पुढचे आठ दिवस त्यासाठी महत्वाचे…

Read Full News

बिळवस ग्रामपंचायत इमारत ग्रामपंचायतच्या जागेतच उभारा….

तंटामुक्ती समिती अध्यक्ष तातू भागले, उपसरपंच समीक्षा आंगणे यांनी केली जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी;सरपंच मानसी पालव यांचा इमारत अन्य ठिकाणी उभारण्याचा घाट *💫मालवण दि.२१-:* बिळवस ग्रामपंचायतीची इमारत ही ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या जमिनीच्या ठिकाणी उभारणे आवश्यक असताना सरपंच मानसी पालव यांनी दुसऱ्या जागी इमारत उभारण्याचा घाट घातला असून सरपंच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप…

Read Full News

धावत्या आयशर टेम्पोचा टायर फुटल्याने अपघात…

एक गंभीर तर १४ किरकोळ जखमी;जानवली नदिपुलानजीकची घटना *💫कणकवली दि.२१-:* नॅशनल हायवेवर जानवली नदिपुलावरून धावत्या आयशर टेम्पोचा टायर फुटून झालेल्या अपघातात एक गंभीर तर अन्य १४ प्रवासी किरकोळ जखमी झालेआहेत. रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने कॅटरिंग सर्व्हिस चे कामगार या टेम्पोतून कॅटरिंग सामानासह जात होते. धावत्या टेम्पोचा टायर फुटून…

Read Full News

मला विचारल्या शिवाय कोणाचीही विज जोडणी तोडायची नाही…

पालकमंत्री उदय सामंत यांचे महावितरणला आदेश;व्यापारी महासंघाची यशस्वी शिष्टाई *💫मालवण दि.२१-:* कोरोना काळात लागू करण्यात आलेली वाढीव विजबिले आणि बिल न भरल्याबाबत होणारी वीज मीटर तोडणी याबाबत आज सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन लक्ष वेधले असता सिंधुदुर्गातल्या एकाही विज ग्राहकाचा विज पुरवठा मला सांगितल्या शिवाय खंडीत करायचा नाही आणि कोरोना…

Read Full News

You cannot copy content of this page