Headlines

महाराष्ट्रात लॉकडाऊन लावायचा का….?

मुख्यमंत्र्यांचं जनतेला 8 दिवसांचं अल्टीमेटम

*💫मुंबई दि.२३-:*  महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा का? हा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला थेट विचारला आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी रात्री सात वाजता संवाद साधला त्यावेळेस त्यांनी हा सवाल केला आहे. लॉकडाऊन लावायचा की नाही याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही तर तुम्हीच मला द्या असंही मुख्यमंत्री म्हणाले. पुढचे आठ दिवस त्यासाठी महत्वाचे असल्याचही मुख्यमंत्र्यांनी सुचित केलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार की नाही याचा निर्णय पुढच्या आठ दिवसात होऊ शकतो. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते मास्कशिवाय फिरतील आणि ज्यांना तो नको आहे ते मास्क घालून फिरतील असं मुख्ममंत्री म्हणालेत.

You cannot copy content of this page