कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून “सन्मान नारीचा, सन्मान नवदुर्गांचा” कार्यक्रम उत्साहात संपन्न…!

⚡बांदा ता.२९-:ग्रामीण व डोंगराळ भागातील महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून “सन्मान नारीचा, सन्मान नवदुर्गांचा” हा कार्यक्रम इन्सुली येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पोलीस पाटील, डॉक्टर, वकील, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योजिका व सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी भूषवले….

Read More

आजच्या तरूणाईने वैचारिकदृष्टया सक्षम होणे ही आजच्या काळाची गरज…

डॉ. गोविंद काजरेकर:”राष्ट्रीय सेवा योजना दिना”चा कार्यक्रम संपन्न.. ⚡बांदा ता.२९-: “आजची तरुणाई ही देशाच्या भवितव्यासाठी सजग, तत्पर आणि संवेदनशील असायला हवी. त्यासाठी आजच्या तरूणाईने वैचारिकदृष्टया सक्षम होणे ही आजच्या काळाची गरज आहे, आजची तरूणाई देशाच्या भवितव्याचा विचार करणारी अशी आहे आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सेवा योजनेतून समाजाभिमुख विद्यार्थी घडू शकतात व त्याचे सामर्थ्य आजच्या शिक्षण…

Read More

सौ. दर्शना देसाई यांचे निधन…!

⚡बांदा ता.२९-: मुंबई-विलेपार्लेचे माजी आमदार तथा डेगवे हितवर्धक संघ मुंबईचे अध्यक्ष गुरुनाथ देसाई यांच्या पत्नी सौ. दर्शना गुरुनाथ देसाई (वय ६५) यांचे रविवारी रात्री निधन झाले. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.डेगवे हितवर्धक संघ मुंबईचे सदस्य उल्हास देसाई यांनी सांगितले की, दर्शना देसाई यांचा डेगवे हितवर्धक…

Read More

नाग्या महादू निवासी वसतिगृहातील मुलांना स्पोर्टस् योगाचे प्रशिक्षण…

⚡वेंगुर्ला ता.२९-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉ.वसूधाज योगा अॅण्ड फिटनेस अकॅडमीतर्फे वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहातील मुलांना स्पोर्टस् योगाचे प्रशिक्षण देण्यात आले.हा प्रशिक्षण कार्यक्रम डॉ.वसूधाज योगा अॅण्ड फिटनेस अकॅडमी, आणि वेंगुर्ला भाजपा महिला आघाडीतर्फे घेण्यात आला. यात डॉ.वसुधा मोरे,…

Read More

सांगिर्डे येथील नवरात्रोत्सवात खेळ पैठणीचा जल्लोष…

सीमा शिंदे ठरल्या पैठणीच्या मानकरी.. कुडाळ : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सांगिर्डे येथे झालेल्या होम मिनिस्टर अर्थात खेळ  पैठणीच्या स्पर्धेत सीमा शिंदे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. निवेदक गायक समीर चराटकर याचे सुरेल आणि उर्जावान सादरीकरण, त्याचबरोबर  भाई तेरसे  यांची वादनावरची किमया यामुळे या कार्यक्रमाने उपस्थितांची वाहवा मिळविली. या निमित्ताने अनेक गुणवंतांचे सत्कार करण्यात आले.    वालावलकर कुटुंबीय…

Read More

कुडाळ येथे २ ऑक्टोबरला ह.भ.प. श्री. मांडके बुवांचे कीर्तन…

⚡कुडाळ ता.२९-: येथील श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांच्या वतीने गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९ वा. विजयादशमी निमित्त श्री देव कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ येथे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीपबुवा मांडके रामदासी यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. कीर्तनाचे कथानक ‘वरवरदेश्वर चरित्र अर्थात पार्वती सांत्वन चरित्र आहे. कीर्तन रसिकांनी कीर्तनाला उपस्थित रहावे अशी…

Read More

बोगस कामाबाबत कुडाळचे उपअभियंता श्री. पिसाळ यांची चौकशी करा !

उबाठाच्या अतुल बंगे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.. ⚡कुडाळ ता.२९-: तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन झालेल्या बोगस रस्ता कामांसह या विभागाचे उपअभियंता धीरज कुमार पिसाळ यांची ही चौकशी व्हावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी अतुल बंगे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान २०२३ पासून ते २०२५ पर्यंत तालुक्यात…

Read More

अतिक्रमणे काढा नाहीतर ८ ऑक्टोबरपासून धडक कारवाई…

कुडाळ नगर पंचायत प्रशासनाचा अल्टिमेटम:अतिक्रमणे काढण्यासाठी ७ दिवसांची मुदत.. ​कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे किंवा अनधिकृत बांधकामे आणि शेड्स हटविण्यासाठी नगरपंचायतीने जाहीर सूचना काढून ७ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. मुदतीत अतिक्रमण न काढल्यास ८ तारखेला कोणतीही पूर्वसूचना न देता धडक कारवाई करण्यात येणार असून ही अतिक्रमणे काढण्यात येतील व जप्त केली…

Read More

शाळा तिथे दाखला’ उपक्रमाला कुडाळ तालुक्यात उत्तम प्रतिसाद…

तहसीलदार श्री. वसावे:कुडाळ इंग्रजी माध्यम शाळेत ४९ दाखल्यांचे वितरण.. कुडाळ : सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत ‘शाळा तिथे दाखला’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याला कुडाळ तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. दाखले वितरण शाळा शाळांमधून होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांचा वेळ वाचत आहे. विद्यार्थ्यांना वितरित केलेले दाखले महत्वाचे आहेत, ते सांभाळून ठेवा असे आवाहन कुडाळचे तहसीलदार…

Read More

खड्डे बुजून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला 23 कोटी 78 लाख रुपयांचा निधी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणी मुळे सा.बा.मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला भरघोस निधी.. ⚡कणकवली ता.२९-:खड्डे बुजून रस्त्यांची डाग डुजी करावी जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत व्हावे यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या विनंती वजा आग्रहामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 23 कोटी 78 लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री…

Read More
You cannot copy content of this page