मनसेच्या पाठपुराव्याने बांद्यातील धोकादायक विद्युत खांबांची अखेर बदली…

⚡बांदा ता.०२-: बांदा येथील बांदेश्वर माऊली मंदिराच्या पाठीमागील माजगावकर यांच्या घरासमोरील तसेच बांदेश्वर मंदिर शेजारील रस्त्याच्या मधोमध असलेले दोन विद्युत खांब मुळातून कट झाल्याने धोकादायक स्थितीत होते. याबाबत संबंधित विभागाला वारंवार कळवूनही कार्यवाही होत नसल्याने मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी पुढाकार घेऊन सातत्याने पाठपुरावा केल्याने बदलून घेण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी मनसेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांच्याकडे ही बाब मांडली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून हे दोन्ही खांब अवघ्या आठ दिवसांत बदलून नवीन खांब बसवून घेतले.
तसेच बांदा नाबर स्कूल मार्गावरील परेश सावंत यांच्या घरासमोरील लाईटचा पोलही गेल्या चार ते पाच महिन्यांपासून खराब अवस्थेत होता. सावंत कुटुंबियांची वारंवार मागणी लक्षात घेऊन हा पोल देखील बदलण्यात आला.
या कामावेळी मंदार माजगावकर, रुपेश माजगावकर, अनिल माजगावकर, काकुलो माजगावकर, सुनील माजगावकर, मयूर परब, मधुकर परब आदी उपस्थित होते. सर्वांनी समाधान व्यक्त करत संबंधितांचे आभार मानले. स्थानिक पातळीवर तत्परतेने पाठपुरावा केल्यास नागरिकांच्या समस्या मार्गी लागू शकतात, याचे हे उदाहरण असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page